विद्यापीठात वृक्षारोपणाने नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात – १३ प्राणवायू देणाऱ्या झाडांचे रोपण
जळगाव, (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातर्फे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात पर्यावरणपूरक उपक्रमाने करण्यात आली. विद्यापीठ परिसरात वड, पिंपळ, उंबर व आंबा यांसारख्या प्राणवायू देणाऱ्या १३ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमात प्रा. डॉ. म. सु. पगारे (संचालक, भाषा अभ्यास प्रशाळा) यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “वृक्ष म्हणजे निसर्गाचा आधारस्तंभ आहे. वृक्षांचा दातृत्वाचा गुणधर्म प्रत्येकाने आत्मसात करून पर्यावरण संवर्धनात स्वतःचा वाटा उचलला पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संवर्धन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”
कार्यक्रमात प्रा. डॉ. अनिल डोंगरे (अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन), प्रा. डॉ. राकेश रामटेके (संचालक, संगणकशास्त्र प्रशाळा), सीए रवींद्र पाटील (वित्त व लेखा अधिकारी), राजेश जवळेकर (संचालक, नवसंसोधन, नवोपक्रम व साहचर्य मंडळ), तसेच मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांची उपस्थिती होती
बातमी शेअर करा...
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा