विद्यापीठात संचालक विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजना पदांसाठी अर्ज मागविले

बातमी शेअर करा...

विद्यापीठात संचालक विद्यार्थी विकास व राष्ट्रीय सेवा योजना पदांसाठी अर्ज मागविले

जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संचालक विद्यार्थी विकास तसेच संचालक राष्ट्रीय सेवा योजना ही पदे नामनिर्देशनाद्वारे भरण्यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २४ नोव्हेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे.

सदर पदांसाठी अर्ज करताना संबंधित पात्रता व अटींचा संदर्भ महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २३ (क) आणि २३ (ख) तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या १० ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित असाधारण राजपत्र क्र. ३५८ नुसार घ्यावा, असे नमूद करण्यात आले आहे.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था यांचे प्राचार्य / संचालक यांच्या शिफारशीसह कुलसचिव, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्याकडे निर्दिष्ट मुदतीत पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या संदर्भातील सविस्तर परिपत्रक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी निर्गमित केले असून, ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम