
विद्यापीठात 30 जून पासून विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
विद्यापीठात 30 जून पासून विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे दिनांक ३० जून २०२५ पासून विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.
यात भारतीय आणि विदेशी भाषा जसे, फ्रेंच, जर्मन, जपानी, जर्मन भाषा A1 आणि A2 स्तर, संस्कृत, मोडीलिपी या शिक्षणक्रमांसोबत सायबर गुन्हे आणि कायदे, मानसशास्त्रीय कसोट्या आणि मोजमाप, लिंग संवेदनशीलता, ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत, कवयित्री बहिणाबाई : जीवन व काव्य, तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचे तत्त्वज्ञान आदी शिक्षणक्रमांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे मातत्याने रोजगाराभिमुख नवनवीन उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसाय करून शिक्षणाची संधी विभागाद्वारे उपलब्ध करून दिली जाते. गेल्या काही वर्षांपासून विविध भाषेतील तज्ज्ञांची गरज अधिक प्रमाणात वाढत असल्याने एकापेक्षा अनेक भाषांचे ज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरापर्यंतच्या रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या हेतूने कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली आजीवन विभागाद्वारे विद्यार्थी अधिक कौशल्याधीष्ठीत होण्यासाठी घरी बसल्या बसल्या ऑनलाईन पद्धतीने विविध प्रमाणपत्र शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाईन पद्धतीने प्रमाणपत्र शिक्षणक्रम पूर्ण करण्याची सुविधा, विषय तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शकांद्वारे मार्गदर्शनाची संधी, आठवड्यातून दोन दिवस ऑनलाईन वर्ग सुविधा (काही शिक्षणक्रमात प्रात्यक्षिक कार्यसाठी विद्यापीठात यावे लागते) शिक्षणक्रमअंतर्गत कार्य यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच विद्यापीठाकडून अधिकृत प्रमाणपत्र मिळणार असल्याची या शिक्षणक्रमांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाच्या आजीवन विभागाद्वारे करण्यात आले आहे.
ऑनलाईन प्रवेश लिंक आणि अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. https://nmu.ac.in/external-education/en-us/Programmes/Certificate-Program तसेच अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा – ०२५७-२२५७४९५,२२५८४९६.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम