विद्यापीठात 30 जून रोजी जिमखाना डे चे आयोजन ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे राहणार उपस्थित

बातमी शेअर करा...

विद्यापीठात 30 जून रोजी जिमखाना डे चे आयोजन ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे राहणार उपस्थित

जळगाव दि. २८ (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आयोजित जिमखाना डे या कार्यक्रमास केंद्रीय राज्य व युवक कल्याण क्रीडामंत्री श्रीमती. रक्षा खडसे उपस्थित राहणार असून अध्यक्ष स्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी असणार आहेत.

विद्यापीठात सोमवार दि. ३० जून रोजी सकाळी १० वाजता अधिसभा गृहात जिमखाना डे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडूंचा गौरव या कार्यक्रमात केला जाणार आहे. तसेच दक्षिण पश्चिम विभागीय, अखिल भारतीय, आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धा व क्रीडा महोत्सव स्पर्धा तसेच भारतीय विद्यापीठ संघात निवड झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक, रौप्य पदक, कांस्य पदक प्राप्त खेळाडूंचा आणि नुकत्याच जाहीर झालेल्या शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमास प्र.कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, वि. प. सदस्य, प्राचार्य उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम