विद्यापीठात HIV – एड्स जनजागृती कार्यशाळा संपन्न

बातमी शेअर करा...

विद्यापीठात HIV – एड्स जनजागृती कार्यशाळा संपन्न

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे प्रशाळेत दि. १५ सप्टेंबर रोजी जिल्हा एड्स प्रतिबंधक विभाग, जळगाव व राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) यांच्या संयुक्त विद्यमाने HIV – एड्स जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेच्या प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. प्रास्ताविकात महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कविता पाटील यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. मनीषा वानखेडे यांनी HIV – एड्स या गंभीर विषयावर मार्गदर्शन करत असुरक्षित लैंगिक संबंध टाळणे, काळजी घेणे आणि समाजात तळागाळापर्यंत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

रुपाली दिक्षित यांनी मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना तणावावर मात करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर कल्पना चावला आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी उदाहरणे ठेवली.

समारोपात रासेयो संचालक डॉ. व्ही. एम. रोकडे यांनी स्वयंसेवकांना HIV – एड्स व मानसिक आरोग्य या दोन्ही क्षेत्रांत सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. गल्लीपासून मोहल्ल्यापर्यंत जनजागृती घडवून आणणे ही विद्यार्थ्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यशाळेस रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोज इंगोले, गोदावरी फाउंडेशनचे श्री. विश्वनाथ कोळी, काशिनाथ पाटील, डॉ. सुषमा तिनगोटे, प्रा. विनेश पावरा, प्रा. योगेश माळी, प्रा. विरेश पाटील, डॉ. समाधान बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन माधुरी सपकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जागृती पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम