
विद्यार्थ्यांची माधवराव गोळवलकर रक्तपेढीला शैक्षणिक भेट
विद्यार्थ्यांची माधवराव गोळवलकर रक्तपेढीला शैक्षणिक भेट
रक्तदान प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळवली
जळगाव (प्रतिनिधी) – विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा, वाघ नगर, जळगाव येथील ८वी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी आज बुधवार, दि. ३० जुलै २०२५ रोजी माधवराव गोळवलकर रक्तपेढीला शैक्षणिक भेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी रक्तदान प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली आणि रक्तसंकलन, प्लेटलेट्स व प्लाझ्मा वेगळे करण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली. रक्तपेढीचे संपूर्ण कामकाज समजून घेत शंका निरसनही करण्यात आले.
या प्रकल्प भेटीदरम्यान डॉ. मकरंद वैद्य यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील आणि समन्वयक श्री. सचिन गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
या भेटीचे नियोजन प्रकल्प प्रमुख सौ. पूनम खर्चाने यांनी केले होते. सौ. ज्योती नेतकर, श्री. आकाश शिंगाणे आणि श्री. श्रीराम लोखंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम