
विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी दोन अभ्यासक्रम शिकण्याची संधी; तीन विद्यापीठांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी
विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी दोन अभ्यासक्रम शिकण्याची संधी; तीन विद्यापीठांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी
जळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आज (दि. १ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीमध्ये महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय सोनवणे, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विलास सपकाळ, कबचौउमविचे प्रा. एस. टी. इंगळे व प्रा. जोगेंद्रसिह बिसेन यांची प्रमुख उपस्थिती होती.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना कबचौउमविचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड आणि एम. जी. एम. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर उपस्थित होते. या वेळी विद्यापीठांनी तयार केलेले माहितीपत्रक प्रा. विलास सपकाळ यांच्या हस्ते प्रकाशित झाले तर पोर्टल “For Two Degree Program Simultaneously” च्या उद्घाटनाचे काम प्रा. संजय सोनवणे यांनी केले. हे पोर्टल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ www.nmu.ac.in

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम