विद्यार्थ्यांसाठी पेटंट प्रशिक्षण कार्यशाळा

पेटंटच्या संकल्पना, शोध प्रक्रिया आणि नोंदणीबाबत सविस्तर मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

विद्यार्थ्यांसाठी पेटंट प्रशिक्षण कार्यशाळा

पेटंटच्या संकल्पना, शोध प्रक्रिया आणि नोंदणीबाबत सविस्तर मार्गदर्शन

जळगाव, (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बौद्धिक संपदा हक्क कक्षातर्फे ‘पेटंट शोध आणि मसुदा प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत पेटंटच्या संकल्पना, शोध प्रक्रिया आणि नोंदणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी नागपूर येथील राजीव गांधी बौद्धिक संपदा व्यवस्थापन संस्थेचे सहाय्यक नियंत्रक कुमार राजू यांनी विद्यार्थ्यांना पेटंटच्या विविध पैलूंवर सखोल माहिती दिली. पेटंटचा शोध, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया, आणि मसुदा कसा तयार करावा याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.

कार्यशाळेस बौद्धिक संपदा कक्षाचे समन्वयक डॉ. विकास गिते, प्रा. दिलीप हुंडीवाले, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रा. अजयगिर गोस्वामी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन डॉ. सारंग बारी यांनी केले, तर आभार मयूर पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम