विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा...

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात घडली घटना
जळगाव | शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्रेमभंगाच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (२७ एप्रिल) सकाळी उघडकीस आली. मृत विद्यार्थ्याचे नाव सत्तू कोळी असल्याचे समजते, मात्र त्याचे पूर्ण नाव अद्याप समोर आलेले नाही.

आत्महत्या करण्यापूर्वी सत्तूने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टेटसद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सकाळी काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास ही घटना येताच त्यांनी तात्काळ महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठविला आहे.

या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तसेच, मृत विद्यार्थ्याची संपूर्ण ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी जिल्हा पेठ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम