विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षांकडे शिफारस

महाविकास आघाडीने घेतला निर्णय

बातमी शेअर करा...

विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षांकडे शिफारस

महाविकास आघाडीने घेतला निर्णय

मुंबई वृत्तसंस्था

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या पक्षांनी संयुक्तरित्या भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाला विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक संख्याबळ मिळाले नाही.

विरोधी पक्ष नेते पदासाठी सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र, शेवटी अनुभवी नेते भास्कर जाधव यांच्यावर सर्वांचा एकमताने निर्णय झाला.काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी स्वतःला क्षमतेनुसार संधी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या शक्यतेच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या शक्यता फेटाळून लावल्या होत्या.

भास्कर जाधव यांचा राजकीय अनुभव लक्षात घेऊन त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याचे मानले जात आहे.आता विधानसभेत विरोधकांची भूमिका कशी राहते आणि सत्ताधारी पक्ष यावर कसा प्रतिसाद देतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम