विवरे येथील दोघा तरुणांच्या प्रमाणिकपणा शेतकऱ्याला दोन लाखाच्या सोन्याच्या अंगठ्या केल्या परत

बातमी शेअर करा...

रावेर

शहरात मुंजलवाडी येथील शेतकऱ्यांच्या दोन लाखांच्या सोन्याच्या अंगठ्या हरविल्या होत्या .विवरे येथील दोघ तरुणांनी त्यांना सापडलेल्या दोन लाखाच्या अंगठ्या प्रामाणिकपणे शेतकऱ्यांला परत केल्याची घटना रावेर येथे घडली .अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय त्या तरुणांनी आणून दिला.

विवरा बुद्रुक येथील ओम गिरीश राणे, (वय 23 वर्षे) आणि करण गिरीश राणे, (वय २४ वर्षे) हे कामानिमित्त रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात परिसरात गेले असता त्यांना सोन्याच्या तीन अंगठ्या सापडल्या.त्यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांची भेट घेऊन त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालय परिसरात सोन्याच्या अंगठ्या सापडल्या बाबतची माहिती दिली.त्या अंगठ्या पोलिस स्टेशनमध्ये जमा केल्या.पोलिस निरीक्षक जयस्वाल यांनी उपनिरीक्षक तुषार पाटील यांना अंगठ्या सोन्याच्या आहेत की नाही. याची खात्री करुन ज्याच्या अगंठ्या हरवल्या आहेत त्यांचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या. उपनिरीक्षक तुषार पाटील, पोहेकाँ सुनिल वंजारी व पोकाँ अतुल गाडीलोहार यांनी चौकशीकरुन शोध घेतला असता सदर अंगठ्या मुंजलवाडी येथील शेतकरी भिका नथ्थु धनगर (वय८५ वर्षे) यांच्या असल्याची खात्री झाली.पोलिस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी भिका धनगर यांना दोन लाख रुपये किंमतीच्या सुमारे २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या परत केल्या व ज्या दोन तरुणांनी प्रामाणिकपणा दाखवत त्या अंगठ्या रावेर पोलीस स्टेशन येथे जमा केल्या त्यांचा पुष्पगुच्छ व मिठाई देवुन सत्कार केला.अंगठ्या परत मिळाल्यामुळे शेतकरी भिका धनगर यांनी पोलीस प्रशासनाचे व दोन्ही मुलांचे आभार मानले .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम