
विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
अमळनेर तालुक्यातील चौबारी येथील घटना
अमळनेर प्रतिनिधी
तालुक्यातील चौबारी येथील २५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास | घेतल्याची घटना १९ रोजी घडली. चौबारी येथील विवाहिता जागृती नीलेश पाटील (वय २५) या विवाहितेने राहत्या घरी लोखंडी कडीला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आले.
मयत जागृती हिचे २०२१मध्ये चौबारी येथील नीलेश कैलास पाटील याच्याशी लग्न झाले होते व त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून या प्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम