विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

बातमी शेअर करा...

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

पाचोरा, (प्रतिनिधी) – सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पाचोरा शहरात घडली. चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून होणाऱ्या मारहाणीमुळे मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने आयुष्य संपवले. या प्रकरणी पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणपती नगर, पुनगाव रोड पाचोरा येथील रहिवासी माधुरी हिने २०२३ साली विशाल सोनवणे याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर काही काळ सुखाचे आयुष्य जगल्यानंतर पती विशालने तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत मारहाण सुरू केली होती. या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून माधुरीने ३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास नंदनवन सिटी, पाचोरा येथील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

याप्रकरणी मयत माधुरी हिचे वडील धनराज मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती विशाल सोनवणे याच्याविरोधात पाचोरा पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलिस करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम