विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासूविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा...

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, सासूविरुद्ध गुन्हा
जळगाव : ठेकेदारी व्यवसायाकरीता माहेरुन पैसे आणले नाही, म्हणून पतीसह सासूकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी विवाहितेच्या माहेरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विवाहितेचा पती जावेद अजीज कुरेशी व सासू सकीनाबी अजीज कुरेशी (दोघ रा. आक्सानगर, मेहरुण) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहरुण परिसरातील आक्सा नगरात हमीदा जावेद कुरेशी या विवाहिता वास्तव्यास होत्या. विवाहितेच्या पतीने ठेकेदारी व्यावसायाकरीता माहेरुन पैसे आणावे याकरीता तगादा लावला. विवाहितेने
पैसे आणले नाही म्हणून तिच्या पतीसह सासूने विवाहितेला मारहाण करीत छळ सुरु केला. वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून हमीदा कुरेशी या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्म्हत्या केल्याची घटना दि. १५ नोव्हेंबर रोजी घडली होती. यावेळी माहेरच्यांनी सासरच्यांविरुद्ध आरोप करीत तक्रार दाखल केली होती. त्याची चौकशी होवून सासरच्यांनी विवाहितेचा छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जावेद अजीज कुरेशी व सासू सकीनाबी अजीज कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम