विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा...

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्यांविरुद्ध गुन्हा

जळगाव तालुक्यातील किनोद येथील घटना

जळगाव : जो पर्यंत विवाहिता माहेरुन पैसे आणत नाही, तो पर्यंत मारत राहू तुला सोडणार नाही अशी धमकी, देत गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६, रा. किनोद, ता. जळगाव) या विवाहितेला अत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासरच्यांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील किनोद येथे गायत्री ज्ञानेश्वर कोळी या विवाहितेता वास्तव्यास होत्या. घर बांधण्यासाठी माहेरुन विवाहितेने पैसे आणावे, या करीतासासरच्यांकडून छळ केला जात होता. तसेच दि. १ मे रोजी दुपारच्या सुमारास सासरच्यांनी विवाहितेला शिवीगाळ करीत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच तू जो पर्यंत माहेरुन पैसे आणत नाही, तो पर्यंत मारत राहू तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली होती. दरम्यान, विवाहितेच्या माहेरच्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विवाहितेचा पती ज्ञानेश्वर भास्कर कोळी, सासरे भास्कर दामू कोळी, सासू मालूबाई भास्कर कोळी, नणंद अर्चना प्रमोद कोळी, वंदना जितेंद्र कोळी रा. नांद्रा, बु. ता. जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम