विवेकानंद प्रतिष्ठानच्या ‘रंगतरंग’ मध्ये संत परंपरेचे दर्शन

जगद्गुरू श्री संत तुकाराम(तुका झालासे कळस) महानाट्याचे सादरीकरण

बातमी शेअर करा...

जगद्गुरू श्री संत तुकाराम(तुका झालासे कळस) महानाट्याचे सादरीकरण

जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठानच्या रंगतरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम विशिष्ट एका विषयावर आधारित भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केला जातो. यंदा संत परंपरेवर आधारीत नाटकांमुळे राज्यातील संत परंपरेची दर्शन या कार्यक्रमात आले.

सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन प्रदर्शनीचे उद्घाटन हर्षदा नाईक भट यांच्या हस्ते झाले. किल्ले प्रदर्शनीचे उद्घाटन शिवरत्न प्रतिष्ठान अध्यक्ष जयवर्धन नेवे यांचे हस्ते झाले. चित्रकला प्रदर्शनीचे उद्घाटन सप्तपुट ललित कला चित्रकला महाविद्यालय खिरोदा श्री अतुल मालखेडे व कोमल कांकरिया यांच्या हस्ते झाले. तसेच शानभाग विद्यालय सादरीकरण ज्यामध्ये भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचे दर्शन शालेय विद्यार्थी प्रत्यक्षरीत्या रंगमंचावर घडवितात. हे वर्ष पुण्यधोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दी वर्ष आहे म्हणूनच सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानाचे केंद्रबिंदू असलेल्या संत परंपरेचा अनुभव या कार्यक्रमात घेण्यात आला. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाची पुनरावृत्ती अर्थात जगदूरू श्री संत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर आधारित एक नेत्रदीपक व अंगावर रोमांच आणणारा संत परंपरेचा कालखंड सागर पार्क मैदान येथे अनुभवला. संत परंपरा या चार दिवसीय महानाट्यातील पहिले पुष्प आज दि.९ जानेवारी रोजी जगद्गुरू श्री संत तुकाराम (तुका

झालासे कळस) सादरकर्ते कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय यांनी गुंफले. या नृत्य व नाटिकेचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण ७०० विद्याथ्यांनी सहभाग महानाट्यात घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, डॉ. विवेक जोशी, तसेच माजी विद्यार्थी दर्शन फालक (आर्किटेक्ट) तसेच विवेकानंद प्रतिष्ठान उपाध्यक्षा हेमा अमळकर, शानभाग विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख स्वप्निल पाटील, रुपाली पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. सूत्रसंचालन सुर्यकांत पाटील यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय आणि आभार अनुराधा देशमुख यांनी केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम