विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल येथे होळी साजरी

पाला पाचोळा, कागद कचरा याचे होळीत दहन

बातमी शेअर करा...

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल येथे होळी साजरी

पाला पाचोळा, कागद कचरा याचे होळीत दहन

जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल पूर्व प्राथमिक विभागात आणि प्राथमिक विभागात आज *दि. १३ मार्च २०२५ गुरुवार* रोजी *”होळी”* हा सण साजरा करण्यात आला. त्यासाठी मुलांसमोर पाला पाचोळा, कागद कचरा यांची होळी तयार करण्यात आली होती.
होळीचे पूजन उपप्राचार्या डॉ. सौ. हर्षा खडके दीदी आणि समन्वयिका सौ.सविता कुलकर्णी दीदी यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य मा. श्री. ज्ञानेश्वर वाघ सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला* कार्यक्रम प्रमुख सौ. पूजा चंदनकर दीदी यांनी होळीची माहिती सांगून गोष्ट सुद्धा सांगण्यात आली. तसेच पाण्याचा अपव्यय न करता नैसर्गिक रंगांचा वापर करावा हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. सौ. रीना भोईटे दीदींनी नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले तर सौ. जयमाला चौधरी दीदींनी ते कसे तयार करावे याची माहिती दिली. या कार्यक्रमाद्वारे वाईट विचारांचे दहन करून चांगल्या विचारांचा स्वीकार करणे हा संदेश देण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाला ज्ञानेश्वर वाघ समन्वयिका सौ. सविता कुलकर्णी दीदी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

प्राथमिक विभागामध्ये मोठया जल्लोषात होळीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य मा. श्री. ज्ञानेश्वर वाघ सर उपप्रचार्या डॉ.सौ.हर्षा खडके दीदी तसेच जेष्ठ शिक्षिका श्रीमती अनुराधा मुळे दीदी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता चौथीतील कार्तिक जाधव या विद्यार्थ्याने होळीविषयी माहिती सांगितली. *कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे होळी का साजरी केली जाते यामागील कारण विद्यार्थ्यांना समजणे. तसेच संगीत शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून *आज बिरज मे होली रे रसय्या* हे सुमधुर गीत सादर केले. व इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनींनी *माय भवानी* या गीतावर बहारदार असे नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता चौथीतील कु. काव्या शिंपी व कु. श्रावणी बनसोडे या विद्यार्थिनींनी केले..

आभार प्रदर्शन इयत्ता चौथीतील धनुष पाटील या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ. शीतल सोनवणे व सौ. राजेश्वरी सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मा. प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर वाघ सर व समन्वयिका डॉ. सौ. रत्नमाला पाटील दीदी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनींच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम