विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादर
विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादर
जळगाव:प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, इंग्लिश मीडियम स्कूल, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाघ नगर येथे दिनांक 26 जानेवारी 2025 रविवार रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्य प्रवेशद्वारावर व स्टेज च्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली तसेच परिसर सजावट करण्यात आली.सकाळी ७:३० ला कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल मोहन कुलकर्णी उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील , विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेचे शालेय समिती प्रमुख दिलीप महाजन, सदस्या सौ प्रांजली रस्से , इंग्लिश मिडियम स्कूल चे शालेय समिती प्रमुख श्री महेंद्र शिरुडे, समन्वयकसंतोष चौधरी, विवेकानंद प्रतिष्ठानचे प्रशासन अधिकारी दिनेश ठाकरे, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य किशोर पाठक, उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते भारत माता पूजन करण्यात आले व झेंड्याला सलामी देऊन कर्नल श्री मोहन कुलकर्णी यांनी ध्वजारोहण केले या प्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित होते .विद्यार्थ्यांनी उभे राहून राष्ट्रगीत गायले व भारत माता की जय, वंदे मातरम,प्रजासत्ताक दिनाचा विजय असो या घोषणा देण्यात आल्या. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. आचल पाटील या विद्यार्थिनी करून दिला व मुख्याध्यापक हेमराज पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, बुके, देऊन सत्कार करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांसह, विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये देशभक्तीपर गीत गाणी नृत्य आणि प्रात्यक्षिके मनोरे इ.चा समावेश होता. त्यात पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी नन्ना मुन्ना राही हु या गीतावर नृत्य सादर केले. इंग्लिश मिडीयम प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स डेमो सादर केले तर प्राथमिक व माध्यमिक सेमी विभागातील विद्यार्थ्यांनी बांबू ड्रिल व मनोरे यावर प्रात्यक्षिके सादर केली इंग्लिश मीडियम माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य सादर केले.
देशभक्ती ,शांतता, इत्यादी मूल्यांवर प्रकाश टाकत प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु आर्या पाटील व कु अनन्या बोरणारे या विद्यार्थ्यांनी केले. तर आभार प्रदर्शन कु जिज्ञासा इप्पर हिने केले . या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम प्रमुख श्री सचिन गायकवाड यांनी केले यासाठी मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयिका सौ वैशाली पाटील , सौ जयश्री वंडोळे क्रीडा शिक्षक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम