
विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत “आकारांचे जग” प्रकल्प उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांकडून आकारांशी संबंधित भारुड सादर
विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत “आकारांचे जग” प्रकल्प उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांकडून आकारांशी संबंधित भारुड सादर
जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत ” आकारांचे जग” हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केला. याप्रसंगी माध्यमिक विभागातील विद्यार्थांनी गणितीय आकार, कला व सौंदर्य शास्त्रातील आकार तसेच आपल्या दैनंदिन जीवनात वापरत येणाऱ्या विविध वस्तूंमधील आकाराचा वापर करून वैविध्यपूर्ण प्रतिकृती, तसेच भित्तिचित्रे बनवले. प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्री. सुशील पवार, शालेय समिती प्रमुख दिलीप महाजन , डॉ . महेंद्र शिरोडे तसेच मुख्याध्यापक हेमराज पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
इयत्ता ५ वी च्या विद्यार्थांनी गणितातील आकारांशी संबंधित नृत्य सादर केले ,८वी च्या विद्यार्थ्यीनिंनी आकारांशी संबंधित भारुड सादर केले.तसेच इयत्ता ८ वी च्या विद्यार्थिनी कु. चेतना वाघ व कु.शर्वरी राजपूत यांनी सूत्रसंचालन केले व इयत्ता ७ वी ची विद्यार्थिनी कु. प्रेरणा वाघ हिने आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांनी गणितातील आकारांचा तसेच विज्ञान, भाषा, समाजशास्त्र , संगणक , नृत्य या विविध शाखांचा संदर्भ घेऊन वैविध्यपूर्ण प्रतिक्रुती तयार केल्या. या प्रकल्पाचे सादरीकरण नऊ गटांमध्ये करण्यात आले .
१) Artistic maths- कला आणि गणित यांचा समन्वय .
२)The mathemagical magic unite – गणित .
३)The shape innovators of Tommorow- विज्ञान आणि गणित यांचा समन्वय .
४) आकारांचे रंगमंच- भाषा आणि गणित यांचा समन्वय .
५) आकारांचे पुरावे- इतिहास आणि गणित यांचा समन्वय .
६) आकारांची यात्रिका- भूगोल आणि गणित यांचा समन्वय .
७) Techno maths- संगणक आणि गणित यांचा समन्वय
८) Geometry genius- गेम्स , पझल्स .
९) Dance and skit नऊ गटांमध्ये करण्यात आले . प्रकल्पाचे नियोजन प्रकल्प प्रमुख कु. प्रांजली नाले यांनी केले. यासाठी मुख्याध्यापक श्री. हेमराज पाटील व समन्वयिका सौ. वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रकल्प यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम