विवेकानंद प्रतिष्ठान शाळेत संस्कृत दिन व रक्षाबंधन साजरे

बातमी शेअर करा...

विवेकानंद प्रतिष्ठान शाळेत संस्कृत दिन व रक्षाबंधन साजरे

जळगाव – विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, वाघ नगर येथे ८ ऑगस्ट रोजी संस्कृत दिन व रक्षाबंधन साजरे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना आणि मधुराष्टकम् सादरीकरणाने झाली.

इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी “वर्षाधारा” हे संस्कृत गीत नृत्य सादर केले. संस्कृत दिन व रक्षाबंधनाचे महत्त्व इयत्ता आठवीची प्रेरणा वाघ आणि दहावीचा दीपक वाघुळदे यांनी मांडले. प्रमुख अतिथींनी संस्कृत भाषेचे आणि रक्षाबंधनाचे महत्त्व आपल्या मनोगतात व्यक्त केले.

“पर्यावरणपूरक रक्षाबंधन” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून त्यांचे संवर्धन करण्याचे दायित्व स्वीकारले. वर्गातही विद्यार्थ्यांनी एकमेकांना राख्या बांधल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या आचल पाटील व प्रणाली बावस्कर यांनी संस्कृत भाषेत केले.

या कार्यक्रमास विवेकानंद प्रतिष्ठानचे संगीत व सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण सोहळे, शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयक सचिन गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रम प्रमुख सौ. मिना मोहकर यांनी नियोजन केले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम