विवेकानंद प्रतिष्ठान शाळेत पालक-शिक्षक संघाची स्थापना

बातमी शेअर करा...

विवेकानंद प्रतिष्ठान शाळेत पालक-शिक्षक संघाची स्थापना

 

 

नवीन कार्यकारिणीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

 

जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, वाघ नगर येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी पालक-शिक्षक संघाची (PTA) पहिली सभा ११ ऑगस्ट २०२५, सोमवारी पार पडली. या सभेत ४१ सदस्यांच्या उपस्थितीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. या वेळी संघाची रचना पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली:

  • अध्यक्ष: मुख्याध्यापक श्री. हेमराज आधार पाटील
  • उपाध्यक्ष: सोनम संदीप दुसाने
  • सचिव: प्रतिभा अशोक चौधरी
  • सहसचिव: सौ. जयश्री अरविंद चित्तेसौ. वैशाली अर्जुन सोनार

या सभेत नवनिर्वाचित अध्यक्षांनी पालक-शिक्षक संघाचे कर्तव्य स्पष्ट केले. तसेच, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा, आगामी उपक्रम, प्रकल्प, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा याविषयी थोडक्यात चर्चा करण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम