
विवेकानंद प्रतिष्ठान शाळेत विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका
जळगाव: वाघ नगर येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळेच्या माध्यमिक विभागात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एका दिवसासाठी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका यशस्वीपणे पार पाडली.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस वंदन करून झाली. शिक्षक दिनाचे महत्त्व आणि डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. या प्रसंगी, दहावीतील राजवीर श्रीकांत पाटील याने मुख्याध्यापकाची, तर नीरज ललित सोनवणे याने उपमुख्याध्यापकाची जबाबदारी सांभाळली.
दहावीचे विद्यार्थी प्रणव गजानन पाटील आणि आर्या ज्ञानेश्वर पाटील यांनी समन्वयकाची भूमिका बजावली, तर आचल जगन्नाथ पाटील हिने पर्यवेक्षक म्हणून कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेजल पाटील आणि जिज्ञासा इप्पर यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम प्रमुख आकाश शिंगाणे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, समन्वयक सचिन गायकवाड आणि सांस्कृतिक प्रमुख वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम