विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक प्रशिक्षण सत्राचे यशस्वी आयोजन

बातमी शेअर करा...

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक प्रशिक्षण सत्राचे यशस्वी आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) –विवेकानंद प्रतिष्ठान संचालित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेमध्ये दिनांक २३ ते २५ जुलै २०२५ या कालावधीत तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रांमध्ये विविध शैक्षणिक विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

२३ जुलै रोजी सत्राची सुरुवात परीक्षा प्रमुख श्री. आकाश लक्ष्मण शिंगाणे यांच्या मार्गदर्शनाने झाली. त्यांनी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत राबवण्यात येणाऱ्या मूल्यमापन पद्धतीचे स्वरूप, बदल आणि शासननिर्देशांचे पालन यावर सविस्तर माहिती दिली. तसेच गुणपत्रकाच्या नव्या प्रारूपाचे स्पष्टीकरण दिले.

२४ जुलै रोजी दुसऱ्या दिवशी संगणक प्रमुख सौ. शुभांगी येवले यांनी शैक्षणिक कार्यात संगणकाचा प्रभावी वापर, स्मार्ट वर्कचे तंत्र, डिजिटल साधनांचा उपयोग याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले.

२५ जुलै रोजी तिसरे सत्र पार पडले. यावेळी माध्यमिक विभाग समन्वयक श्री. सचिन गायकवाडप्राथमिक विभाग समन्वयक सौ. भाग्यश्री वारुडकर यांनी “विद्यार्थी, पालक आणि शाळेप्रती शिक्षकांची जबाबदारी” या विषयावर विचार मांडले. त्यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व भावनिक विकासासाठी प्रेरक भूमिका पार पाडावी, तसेच त्यांच्या ध्येय, मूल्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या जडणघडणीसाठी प्रयत्नशील राहावे, असे सांगितले.

प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन श्री. आकाश शिंगाणे यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम