
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा चे आयोजन
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा चे आयोजन
जळगाव प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा वाघ नगर येथे २८ शुक्रवार रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आहे .कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्राध्यापक व शास्त्रज्ञ श्री सतीश पाटील सर लाभले .कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ. ९वी वर्गातील स्वरदा साने आणि आर्या पाटील या विद्यार्थीनींनी केले. तसेच तेजस्विनी बाठे हिने विज्ञान दिनाबद्दल माहिती आणि आचल पाटील हिने डॉ. सी व्ही रमण यांची माहिती सांगितली . लक्ष्मी दीदी यांनी पाहुण्यांचे परिचय करून दिले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी आणि संगीत शिक्षिका महिमा दीदी यांनी विज्ञान गीत सादर केले . इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. तसेच इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी शेतकरी वर आधारित नाट्य प्रस्तुत केले. तसेच इयत्ता पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रश्नमंजुषा चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील वेगवेगळ्या घटकांवर आधारित मॉडेल द्वारे विज्ञान विषयाची रुची प्रस्तुत केली. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे प्रा. व शास्त्रज्ञ सतीश पाटील सरांनी स्वतः निर्मित केलेले उपकरण विद्यार्थ्यांना सविस्तर समजून सांगितले आणि विद्यार्थ्यांना आव्हान केले विज्ञान विषय फक्त पाठ करून नव्हे तर विज्ञान बद्दल जिज्ञासा व चिकित्सकृती निर्माण झाली पाहिजे आणि कृतीतून अभिव्यक्त करावी.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमराज पाटीक सर व समन्वयिक सौ. वैशाली पाटील दीदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सौ .लक्ष्मी सोनवणे दीदी यांनी केले .कार्यक्रमाचे आभार इयत्ता नववीतील विद्यार्थिनी अनन्या बोरनारे हिने केले.-+

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम