
विशेष मोहीमेत १० गावठी कट्ट्यांसह २४ काडतूस हस्तगत
विशेष मोहीमेत १० गावठी कट्ट्यांसह २४ काडतूस हस्तगत
जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हाभरात राबविली मोहीम; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
जळगाव : जिल्ह्यात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध लागावा, या करीता जिल्हा पोलीस दलाकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहीमेत केलेल्या कारवाईमध्ये १० गावठी कट्ठयांसह २४ जीवंत काडतूस जप्त केले. याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून दि. १५ सप्टेंबर ते दि. ३० सप्टेंबर दरम्यान ही मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समाधान बळीराम निकम (रा. पाचोरा) याच्याकडून दोन कट्टे आणि १ काडतूस
जळगांव जिल्हा पोलीस
जप्त केले. त्याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. तसेच अमळनेर येथील अनिल मोहन चंडाले (रा. अमळनेर) याच्याकडून २ कट्टे, चार काडतूस,
यावल येथील युवराज उर्फ युवा राजू भास्कर (रा. यावल) याच्यासह अन्य एका जणाकडून गावठी कट्टा, दोन काडतूस, भुसावळ येथील अमर देविसिंग कसोटे (रा. भुसावळ) याच्याकडून १ कट्टा, २ काडतूस जप्त असून त्यांच्याविरुद्ध यापुर्वी प्रत्येक एक गुन्ह्याची नोंद आहे. वरणगाव येथील काविन बाबू भोसले (रा. हलखेडा) यांच्याकडून गावठी कट्टा, दोन काडतूस तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विठ्ठल वामन भोळे जप्त केले (रा. जळगाव, ह.मु. पुणे) याच्याकडून १ कट्टा ४ काडतूस जप्त केले असून त्याच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम