विशेष संवाद : ‘दृष्टी विकासाची, निवड तरुणाईची’; नगरसेवक निखिल चौधरींचे अंबरनाथसाठी ‘व्हिजन’

बातमी शेअर करा...

विशेष संवाद : ‘दृष्टी विकासाची, निवड तरुणाईची’; नगरसेवक निखिल चौधरींचे अंबरनाथसाठी ‘व्हिजन’
​अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत ५५.१७ टक्के मताधिक्य मिळवत विजयाचा गुलाल उधळणारे युवा नेतृत्व निखिल सुनील चौधरी सध्या चर्चेत आहेत. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचा मुलगा, ही ओळख पुसून आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी अंबरनाथकरांची मने जिंकली आहेत. नगरसेवक म्हणून त्यांची भविष्यातील वाटचाल आणि शहराविषयीचे व्हिजन याबाबत त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद…
​वारसा कामाचा, ओळख स्वतःची
​”निखिल ही केवळ सुनील चौधरी यांची ओळख आहे,” अशी टीका विरोधकांकडून निवडणुकीत झाली. मात्र, मतदारांनी दिलेल्या ५५ टक्क्यांहून अधिक कौलाने या टीकेला चोख प्रत्यय दिला आहे. राजकारणात येण्यापूर्वी निखिल यांनी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष, रोटरी क्लबचे युवा अध्यक्ष आणि ‘कोमसाप’च्या युवा शाखेचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. साहित्य उद्यान, आनंदघन संगीत उद्यान, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीचा ‘बाळ कोल्हटकर कट्टा’ यांसारख्या सांस्कृतिक प्रकल्पांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
​प्रभाग नव्हे, ‘मिनी इंडिया’!
​आपल्या प्रभागाबद्दल बोलताना निखिल चौधरी अभिमानाने सांगतात, “माझा प्रभाग हे माझे घर आहे. येथे मराठी, जैन, ब्राह्मण, दलित, गुजराती आणि दाक्षिणात्य समाज गुण्यागोविंदाने राहतो. हा प्रभाग म्हणजे ‘मिनी इंडिया’ आहे. सुशिक्षित आणि शांतीप्रिय मतदार हेच माझे बळ आहे. गेल्या २७ वर्षांपासून माझ्या वडिलांनी या भागाची जी सेवा केली, तीच परंपरा अधिक आधुनिकतेने पुढे नेण्याचा माझा मानस आहे.”
​विकासाची नवी व्याख्या : लोकांचे राहणीमान उंचावणे
​केवळ रस्ते आणि गटारी म्हणजे विकास नव्हे, तर नागरिकांचे राहणीमान उंचावणे, हे निखिल चौधरींचे विकासाचे सूत्र आहे. यासाठी ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ‘व्हिजन’वर विश्वास ठेवतात.
​प्राधान्यक्रम : प्रभागाचे सुशोभीकरण, अत्याधुनिक नागरी सुविधा आणि सांस्कृतिक वारसा जपणे.
​मार्गदर्शक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निधी आणून प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे.
​वाचन, चिंतन आणि अनुभवाची शिदोरी
​राजकारणात अभ्यासाचे महत्त्व सांगताना निखिल म्हणतात, “सचिन तेंडुलकर मोठे खेळाडू झाले पण आचरेकर सर मोठे शिक्षक झाले. तसेच राजकारणात वयापेक्षा तुमची तळमळ महत्त्वाची असते.” यशवंतराव चव्हाणांचे ‘कृष्णाकाठ’ आणि विश्वास पाटील यांची ‘पानिपत’ यांसारख्या साहित्यातून ते प्रेरणा घेतात. अंबरनाथला ‘पुस्तकांचे शहर’ बनवण्याच्या मोहिमेत त्यांनी मोलाची भूमिका बजावली असून, सुप्रसिद्ध कवी किरण येले, दिग्दर्शक महेंद्र पाटील यांसारख्या दिग्गजांच्या सहवासात ते स्वतःची वैचारिक जडणघडण करत आहेत.
​भविष्यातील संकल्प
​”स्काय इज द लिमिट” (आभाळ हेच सीमा आहे) असे म्हणत, निखिल आपल्या तरुण टीमच्या सोबतीने अंबरनाथचा कायापालट करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्यासोबत कृष्णा इंचवड, गणेश चिपळूणकर, निलेश पाताडे आणि आदित्य काळे यांसारखी तरुण फळी कार्यान्वित आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम