विषारी औषध प्राशन केलेल्या मुलाचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील शेरी येथील घटना

बातमी शेअर करा...

विषारी औषध प्राशन केलेल्या मुलाचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील शेरी येथील घटना

धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेरी गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने विषारी औषध घेतल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

राहुल लोटन भिल (वय १६ रा. शेरी ता.धरणगाव) असे मयत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. राहुल भिल हा आपल्या परिवारासह वास्तव्याला असताना १६ फेब्रुवारी रोजी त्याने घरी कोणीही नसताना काहीतरी विषारी औषध सेवन केले होते. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण तांदळे हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम