
विषारी द्रव सेवन करणाऱ्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
विषारी द्रव सेवन करणाऱ्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू
कुसुंबा येथील दुर्दैवी घटना
जळगाव – कुसुंबा (ता. जळगाव) येथील ५० वर्षीय प्रौढाने विषारी द्रव सेवन केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कैलास लुका पाटील (वय ५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी दि. ४ मे रोजी विषारी द्रव प्राशन केले होते.
विषारी द्रव घेतल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्याने नातेवाइकांनी तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच पाटील यांची प्राणज्योत मंगळवारी (७ मे) रात्री मालवली.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विष सेवनामागील कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिस तपास सुरु आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले व परिवार असून या घटनेमुळे कुसुंबा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम