
विषारी पदार्थ प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू
विषारी पदार्थ प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू
जळगाव प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील एका तरुणाचा विषारी पदार्थ प्राशन केल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रमेश दगडू पाटील (वय ३३, रा. वराडसीम, ता. भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, रमेश पाटील यांनी सोमवार दि. ८ डिसेंबर रोजी विषारी पदार्थ प्राशन केला होता. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात नातेवाइकांच्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विषारी पदार्थ प्राशन करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम