
विहिरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
शिकार करतांना बिबट्याची विहिरीत उडी घेतल्याने झाला मृत्यू
विहिरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
शिकार करतांना बिबट्याची विहिरीत उडी घेतल्याने झाला मृत्यू
मुक्ताईनगर प्रतिनिधी I
विहिरीत पडल्याने एका बिबट्याच्या मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील भोटा शिवारात बुधवारी २२ रोजी घडली असून वनकर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
शिकारीचा पाठलाग करताना भोटा शिवारातील गतुळशीराम मोरे यांच्या शेतातील विहिरीत पडल्याने बिबट्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली . घटनेची माहिती कळताच सहाय्यक वनसंरक्षक यु.एस. बिराजदार, वढोदा वनक्षेत्रपाल परिमल साळुंखे, पशू वैद्यकीय अधिकारी मनोज प्रल्हाद पाटील, डॉ. कपावर महेश्वर, कृष्णा रेड्डी, डॉ. प्रशांत लोंढे, ए.एस.मोरे, स्वप्नील गोसावी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम