वीज खांब्याला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

डोंगरगाव येथील घटना

बातमी शेअर करा...

वीज खांब्याला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

डोंगरगाव येथील घटना

पाचोरा I प्रतिनिधी

तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतशिवारात वीज खांबाच्या तणावास विजेचा प्रवाह उतरला होता. यातच अनभिज्ञ असलेल्या शेतकऱ्याचा तन्नावास स्पर्श झाल्याने ४३ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यास नाहक जीव गमवावा लागल्याने परिसरातून रोष व्यक्त करत भरपाईची मागणी करण्यात येत आहे.

डोंगरगाव येथील शेतकरी दीपक रावजी वाळके (वय ४३) हे १४ रोजी सायंकाळी त्यांच्या मालकीच्या शेतात गेले होते. याच वेळी विहिरीजवळ असलेल्या इलेक्ट्रीक पोलवरील तन्नावात विजेचा प्रवाह उतरलेला

होता. परंतु, हे दीपक वाळके यांच्या लक्षात आले नाही. यातच दीपक वाळके यांचा तन्नावास स्पर्श झाल्याने त्यांना जबर विजेचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पीपक वाळके यांना तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दीपक वाळके यांना तपासून मृत घोषित केले. मयत दीपक वाळके यांच्या पश्चात्य वृद्ध आई, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहिण असा परिवार आहे. अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या दीपक वाळके यांच्या दुर्दैवी निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे दीपक वाळके यांना प्राण गमवावे लागल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत भरपाईची मागणी केली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम