
वीज कोसळल्याने चिखलोड येथे दोन म्हशींचा मृत्यू
वीज कोसळल्याने चिखलोड येथे दोन म्हशींचा मृत्यू
पारोळा : वीज पडल्याने पारोळा तालुक्यातील चिखलोड खुर्द येथील शेतकऱ्यांच्या शेतात बांधलेल्या दोन म्हशीचा जागीच मृत्यु झाल्याची घटना २६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. तर पारोळा शहरासह तालुक्याला दमदार पावसाने झोडपले.
पारोळा शहर व तालुक्यात २६ रोजी दुपारी २ ते ३.३० वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाला सुरुवात झाली. तर तालुक्यातील वीज कोसळल्याने चिखलोड खुर्द येथील युवराज विठ्ठल पाटील यांच्या दोन म्हशी ठार झाल्यात. यात या शेतकऱ्यांचे जवळपास ३ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. दरम्यान, युवराज पाटील यांच्या दोन म्हशींवर वीज कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरल्याने घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. मयत म्हशींचा पंचनाम करण्याच्या सूचना तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी दिली आहे. तर वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम