
वीज सुरक्षेच्या घोषणांनी जळगाव शहर दुमदुमले
जळगाव प्रतिनिधी l रविवारची सकाळ. सुट्टीचा दिवस असल्याने ऐन सकाळच्या प्रहारची रस्त्यावरील निरव शांतता.. अशा प्रसन्न वातावरणात रविवारी सकाळी सात-आठ वाजता निघालेल्या महावितरणच्या सुरक्षाविषयक रॅलीने आणि रॅलीतील वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा घोषणांनी जळगाव शहर दुमदुमले.
6 जून 2025 रोजी महावितरणचा 20 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 6 जून दरम्यान महावितरण तर्फे शुन्य वीज अपघात या कल्पनेतून वीज सुरक्षा सप्ताह विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा पहिला कार्यक्रम म्हणून महावितरणचे मुख्य अभियंता श्री आय. ए. मुलाणी यांच्या नेतृत्वात परिमंडल कार्यालयाच्या जवळील सागर पार्क येथून वीज सुरक्षा रॅली काढण्यात आली. ही रॅली अजिंठा चौक, डी मार्ट रोड ते काव्यरत्नावली चौकातून मार्गस्थ झाली. तेथून परत निघून सागर पार्क येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये कर्मचाऱ्यांच्या हातात वीज सुरक्षेचे संदेश देणारे फलक, हॅण्डी पोस्टर्स होते. रॅलीतील सर्व कर्मचारी वीज सुरक्षेच्या घोषणा देत होते. रॅलीतील या शेकडो कर्मचाऱ्यांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
रॅलीत मुख्य अभियंता श्री आय. ए. मुलाणी यांच्यासह पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज विश्वासे, जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक मुख्य व्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह इतर अधिकारी कार्यकारी अभियंता व इतर सर्व कर्मचारी वीज तंत्रज्ञ जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम