वीरशैव लिंगायत राज्यस्तरीय उपवधू-वर परिचय मेळावा १२ ऑक्टोबर रोजी अमरावतीत

बातमी शेअर करा...

वीरशैव लिंगायत राज्यस्तरीय उपवधू-वर परिचय मेळावा १२ ऑक्टोबर रोजी अमरावतीत
सावदा (प्रतिनिधी) : वीरशैव लिंगायत बहुउद्देशीय सेवा संस्था, अमरावती आणि वीरशैव लिंगायत महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “१४ वा आंतरराज्यीय उपवधू-वर परिचय मेळावा” रविवार, दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येथे पार पडणार आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन डॉ. सौ. संगीताताई दिलीपराव सौंदळे (प्राध्यापिका, विभागीय आरोग्य प्रशिक्षण केंद्र, अमरावती) यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व भगवान बसवेश्वर प्रतिमापूजनाने होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. सुलभाताई सं. खोडके (आमदार, अमरावती) उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. श्री. संजयराव वि. खोडके (विधान परिषद सदस्य), मा. सौ. नवणित रवि राणा (माजी खासदार, अमरावती) आणि मा. श्री. विलासभाऊ म. इंगोले (माजी महापौर, अमरावती) उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला विविध जिल्ह्यांतील मान्यवर, समाजबांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

स्वागत व प्रास्ताविक मनोहरआप्पा कापसे (अध्यक्ष, वीरशैव लिंगायत बहुउद्देशीय सेवा संस्था, अमरावती) करतील. मेळाव्याचे दोन सत्र पार पडणार असून, विविध जिल्ह्यांमधून व राज्यांतून आलेले उपवधू-वर आपली माहिती सादर करतील.

दुपारी १ वाजता शिष्यवृत्ती वितरण आणि दानदात्यांचा सत्कार समारंभ संपन्न होईल. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अनिकेत तोंडारे यांची राहणार आहे. त्यानंतर भोजन व्यवस्था करण्यात आली असून, कार्यक्रमाची सांगता सायंकाळी “चांदीचे लिंग” लकी ड्रॉ आणि पसायदानाने केली जाणार आहे.

या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणी सदस्यांमध्येसुरेंद्रआप्पा गडवे (उपाध्यक्ष), अशोकआप्पा जिवरकर (सचिव), दिलीपआप्पा मानेकर (कोषाध्यक्ष) तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य आणि महिला मंडळाचा मोलाचा सहभाग आहे.

विशेष उपस्थितीमध्ये श्री. शिवशंकर शिवाचार्य स्वामी (नेरपिंगळाई मठ), सौ. विजयाताई गुढे (विश्वस्त, अंबादेवी संस्थान) यांच्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यांतील मान्यवरांचा समावेश आहे.

या उपक्रमातून समाजात विवाह जुळवणीसाठी एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध होत असून, समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वीरशैव लिंगायत बहुउद्देशीय सेवा संस्था, अमरावती कार्यकारिणीने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम