वीर गुर्जर क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्राचा विजेता ठरला अथर्व ट्रॅव्हल्सचा संघ

बातमी शेअर करा...

वीर गुर्जर क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्राचा विजेता ठरला अथर्व ट्रॅव्हल्सचा संघ

सलग दुसऱ्यांदा मारली बाजी ; क्वॉलीटी मेटल्स सतखेड्याचा संघ ठरला उपविजेता

जळगाव – चोपडा शहरात २४ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजीत वीर गुर्जर क्रिकेट लीगच्या दुसऱ्या सत्राच्या अंतीम सामन्यात अथर्व ट्रॅव्हल्सच्या संघाने क्वॉलीटी मेटल्स संघावर तब्बल ३९ धावांनी मात करून, सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषीक वितरण करण्यात आले.

स्पर्धेत मालिकावीर म्हणून अथर्व ट्रॅव्हल्स चा तर्वेश पटेल हा खेळाडू सर्वोत्तम ठरला. बेस्ट बॉलर म्हणून महाकाल प्लायवूड संघाचा आशिष पाटील व बेस्ट फिल्डर म्हणून क्वालिटी मेटल या संघाचा कुणाल पवार याला पारितोषिक देण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंह राजे पाटील, चोपड्याच्या नगराध्यक्षा नम्रता पाटील, शिंदेसेनेचे संपर्कप्रमुख सुनील चौधरी, त्रिमुर्ती फाऊंडेशनचे संचालक मनोज पाटील, दिशा ऑटो लिंकचे अजय पाटील, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, चोपडा बाजार समितीचे माजी उपसभापती नंदकिशोर पाटील, सुरत येथील ॲड.विनोद पाटील, दोडे गुर्जर संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, आयकर निरीक्षक हिरालाल पाटील, माजी नगरसेवक राजाराम पाटील, डॉ.राहुल पाटील, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे चंद्रकांत पाटील, विजेत्या संघाचे प्रायोजक विशाल पाटील, स्कायवीन इंटरनॅशनल स्कुलचे ललित पाटील, कर सल्लागार निवृत्ती पाटील, वीर गुर्जर सेनेचे हेमंत पाटील, डॉ.सत्वशील जाधव, ऋषी कम्प्युटरचे संचालक योगेश पाटील, बाबाजी ऍग्रो चे संदीप पाटील, शेतकी संघाचे संचालक जितेंद्र पाटील, तिलक पाटील, डॉ.मनिष चौधरी, क्वॉलीटी मेटल्सचे राहुल पाटील, स्वराज्य ऑटोचे संचालक अजय चौधरी, महाकाल प्लायवूड चे अमित पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत वंदे मातरम् व वैदीक आव्हाणे या दोन्ही संघांनी अनुक्रमे तिसरे पारितोषीक पटकाविले. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पाटील यांनी केले. तर आभार नचिकेत चौधरी यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम