
वीर गुर्जर सेनेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी
वीर गुर्जर सेनेतर्फे सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी
जळगाव / प्रतिनिधी
स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त वीर गुर्जर सेनेतर्फे पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंहराजे पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गुर्जर समाजाने केवळ राजकीय चर्चेत न अडकता व्यवसाय, शिक्षण, खेळ आणि आधुनिक शेती या क्षेत्रात प्रगती करणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन पिढीला योग्य दिशा मिळावी यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात वीर गुर्जर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील, राष्ट्रीय सचिव मंगल बी. पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, हुकुमचंद सोपान पाटील (मोहिदे) सुरत, निरंजन मनोहर पाटील (पाडळसरे) सुरत, राजेंद्र सुतार, महेंद्र निंबाजी पाटील, कल्पेश सुधाकर पाटील, अक्षय अरविंद पाटील, जयेश महेश पाटील, सागर भगवान पाटील, अमोल अरुण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाजातील विवाह समस्या, वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह सोहळ्याची गरज अशा सामाजिक विषयांवरही विचारमंथन झाले.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी वीर गुर्जर सेना या संघटनेच्या माध्यमातून समाजातील एकता, शिक्षण आणि प्रगतीचा मार्ग मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास नवलसिंहराजे पाटील, हेमंत पाटील, मंगल बी पाटील, राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधव उत्साहाने उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम