
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस संस्थेच्या सभासदांची दुध फेडरेशनला भेट
दूध फेडरेशनच्या सर्व उत्पादनांची प्रक्रिया सादर
वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस संस्थेच्या सभासदांची दुध फेडरेशनला भेट
दूध फेडरेशनच्या सर्व उत्पादनांची प्रक्रिया सादर
जळगाव – वुमेन्स ॲंड चाईल्ड केअर प्लस या संस्थेच्या सभासदांनी काल दुध फेडरेशनला भेट देवून तेथील सर्व उत्पादनांच्या प्रक्रिये बाबत जाणून घेतले.
जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघात उत्पादित होणारे दुध आणि दुग्धजन्य पदार्थ हे स्वच्छ,शुध्द आणि हॉयजेनिक पध्दतीने बनविले जात असल्याने लहाना पासून मोठ्यां पर्यंत सगळ्यांना पोषक असल्याचे दुध फेडरेशनचे संचालक अरविंदभाऊ देशमुख यांनी उपस्थित महिलां समोर नमुद केले.शेतक-यां कडून अधिक प्रमाणात दुध येते मागणी पेक्षा पुरवठा जास्त आहे.शिल्लक दुधातून ताक,बटर,लस्सी,दही,तुप आणि पावडर ई. बनविले जाते.विकासचे तुप गजानन महाराज संस्थानला पाठविले जाते हेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष शांता वाणी यांनी संस्थेच्या कार्याची थोडक्यात माहिती देवून फेडरेशनची कार्य प्रणाली पाहून सर्वच भगिनी प्रेरीत झाल्याचे सांगितले आणि ‘विकास’चे उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचेल यासाठी प्रयत्नशील राहण्याचे नमुद केले.
यावेळी समन्वयक म्हणून भुषण पाटील यांनी उत्तम भुमिका निभावली.तांत्रीक अधिकारी राज साळुंखे आणि प्रतिक पाटील, मार्केटिंग प्रतिनिधी प्रसन्न नाईक यांनी प्रत्येक उत्पादनाची संकलना पासून वितरणा पर्यंतची प्रत्येक प्रक्रिया समजावून सांगितली.तर प्रशासन अधिकारी आर.डी.पाटील यांनी व्यवस्थापन आणि दुध संघाच्या स्थापने पासूनची माहिती दिली.
यावेळी अरविंद देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या सभासदांचे स्वागत केले. हा अभ्यास दौरा यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रुपाली पवार, कोषाध्यक्ष हेमलता कुलकर्णी, शालिनी चौधरी, छाया पाटील ,शालिनी पाटील, पदाधिकारी व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम