वृक्षारोपण आणि जलसंधारणाला जास्त महत्व द्यायला शिका – प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

बातमी शेअर करा...

वृक्षारोपण आणि जलसंधारणाला जास्त महत्व द्यायला शिका – प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज

सावदा प्रतिनिधी

 

जलक्रांती ग्रुप व सावखेडा ग्रामपंचायत ने वृक्षारोपण आणि जलसंधारणाला महत्व दिलं, त्याचं फलित सावखेडा गावाला जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे ५० लाखाचे बक्षीस मिळाले, त्याचप्रमाणे आपणही वृक्षारोपण आणि जलसंधारणाला महत्त्व द्या, असे आवाहन प.पू. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सावखेडा येथे झालेल्या ग्रा.पं सावखेडा बुद्रुक, जलक्रांती ग्रुप व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आयोजित ग्रामरत्नांच्या गौरव सोहळ्यात बोलताना केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांनी तर आभार प्रशांत आंबेकर यांनी केले. पुढे महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज म्हणाले की, जे सावखेडा आणि या परिसरात काम झालंय ह्या मुलांनी जे काम केलंय मी जबाबदारीने बोलतोय की जे या सगळ्या डोंगरात काम झालंय, पहाडात काम झालय, एवढ ्या रात्रंदिवस या पोरांनी काम केलेत, यांना याचा कमी फायदा आहे,

इथून खालच्या सगळ्या परिसराला याचा फायदा झालाय ,म्हणून सावखेडा गावाला ला विशेष धन्यवाद दिले पाहिजे, एकदा सर्वाँना विनंती आहे की, जेवढे महत्त्व आपण आपल्या वृक्षारोपणाच्या कामे करतानाच्या फोटोला देतोय ना त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व सध्या वृक्षारोपणाने जलसंधारणाला द्यायला शिका . शेतकऱ्यांना पण विनंती करेल की, आपल्या बांधावरची झाडे ठेवा, काही नडत नाही ती झाड. असा एरिया नक्की करा की, त्या ठिकाणी ती झाड असतील. आपल्याला बांधावर झाड नको आणि आपल्याला आजारपण पण नको ,असं नाही होत.

तीन गोष्टी लक्षात ठेवा , एक भ्रूण हत्या वाढली म्हणून संकट वाढली दुसरी गोहत्या वाढली म्हणून संकट वाढली आणि तिसर वृक्षांची कत्तल सुरू झाली म्हणून संकट वाढली. सावखेडा गावाची पाण्याची पातळी एकेकाळी २५० फुटाच्या खाली गेली होती ती आज ७५ फुटावर आली आहे.इथे या कार्यक्रमात या परिसरातील सरपंच आहेत, उपसरपंच आहेत ,ग्रामपंचायत सदस्य आहेत म्हणजे अनेक ग्रामपंचायती या ठिकाणी आज उपस्थित आहे. ग्रामपंचायत कामाला महत्व दिलं पाहिजे. तुम्ही सावखेडा गावच कौतुक करायला आलात, तसं तुमच्याही ग्रामपंचायत मध्ये सावखेडा वाले आले पाहिजे . आपण सगळ्यांनी काम करूया आणि देवाने जर आपल्याला पद दिले आपल्याला जर अधिकार दिलाय तर आपण सुंदर काम करून दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा निवडणूक आहे ना तेव्हा फक्त आठवण ठेवायचं की आपण कोणत्या पक्षाचे आहोत, निवडणूक संपल्यानंतर आपण एक आहोत आपण सगळ्यांना सोबत घेऊन मतभेद ,मनभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी या विषयांवर काम करायची गरज आहे. वृक्षांची कत्तल, वृक्ष लागवड, जलसंधारण, हगणदारीमुक्त गाव या गोष्टीकडे लक्ष देऊन कार्य करायचे आहे. मी तुम्हाला शब्द देतो या कार्यासंदर्भात मी जे काही वर्णन केलं, या कामात जिथे कुठे तुम्हाला अडचण आली तिथे आम्हा संतांना आवाज द्या ,आम्ही तुमच्या सोबत आहोत. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गादीपती सतपंथ संस्थान फैजपूर महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज , उपाध्यक्ष श्री स्वामीनारायण गुरुकुल सावदा शास्त्री स्वामी अनंत प्रकाश दास जी , ब्रह्माकुमारी वैशाली दिदी सावदा, माजी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी बबनराव काकडे ,कनिष्ठ भूवैज्ञानिक जळगाव सुधीर जैन , माहिती व शिक्षण संवाद तज्ञ मेघराज देसले, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी के पी वानखेडे, राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रवीण सपकाळे, आशिष भवाने, विस्तार अधिकारी प्रवीण शिंदे, विस्तार अधिकारी उमेश पाटणकर, ग्रामपंचायत अधिकारी सावखेडा बुद्रुक रहीम तडवी ,सरपंच सावखेडा बुद्रुक युवराज कराड, सरपंच सावखेडा खुर्द रवींद्र महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावदा पोलीस स्टेशन विशाल पाटील, खानदेश विभाग कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संतोष नवले, जलसंधारण विभाग के पी पाटील, भारती पाटील,मिलिंद वायकोळे,गोपाळ नेमाडे, सुरेश धनके ,अहमद तडवी, भरत महाजन ,योगेश पाटील, अंगणवाडी सेविका व मदतनीस ,आशा वर्कर, सावखेडा बुद्रुक उपसरपंच मुमताज तडवी, जलक्रांती ग्रुपचे सर्व सदस्य,युवा तरुण, ग्रामस्थ ,शेतकरी ग्रामपंचायत सदस्य,बचत गटाच्या महिला, आशा वर्कर, ह.भ.प.भजनी मंडळ सावखेडा, जि प शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद, परिसरातील सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम