वैकुंठ धाम परिसर स्वच्छ करून गो ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी

हाती धरून झाडू तू मार्ग झाडलाशी स्पर्शे तुझ्या महात्म्या ये थोरवी श्रमाशी..

बातमी शेअर करा...

वैकुंठ धाम परिसर स्वच्छ करून गो ग्रीन फाऊंडेशन च्या वतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी

हाती धरून झाडू तू मार्ग झाडलाशी स्पर्शे तुझ्या महात्म्या ये थोरवी श्रमाशी..

शेगाव /प्रतीनीधी

आज २३ फेब्रुवारी महान निष्काम कर्मयोगी, वैराग्य मूर्ती, चालते बोलते विद्यापीठ, राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती.संत गाडगेबाबा यांनी आपल्या हातात झाडू घेऊन गावा गावातील घाण साफ केली व आपल्या अमृत वाणीने मना मनातील अज्ञान अंधश्रद्धा,आणि अस्वच्छता दूर करण्याचा प्रयत्न केला.संत तुकाराम यांचा पर्यावरण संवर्धनाचा आणि संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा संदेश घेऊन गो ग्रीन फाऊंडेशन प्रयत्न करीत आहे.वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण पूरक उपक्रम राबवून व स्वच्छता अभियान राबवून गो ग्रीन फाऊंडेशन आपली सामाजिक बांधिलकी जोपासत मार्गक्रमणा करीत आहे. त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी संत गाडगेबाबा यांच्या १४९ व्या जयंतीच्या निमित्ताने गो ग्रीन फाऊंडेशन शेगाव च्या वतीने शेगाव येथील वैकुंठ धाम परिसर पूर्ण झाडून, स्वच्छ करून मानवंदना देण्यात आली.

शेवटी वैकुंठ धाम चे संचालक…आदरणीय श्री अशोकराव व्यास यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पमाला अर्पण करण्यात आली.पर्यावरण संवर्धन करणे तसेच घरा घरातून आणि मना मनातून स्वच्छता अभियान राबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि हीच संतांची शिकवण घेऊन गो ग्रीन फाऊंडेशन शेगाव आपले कर्तव्य बजावत आहे.यावेळी स्थानिक रहिवासी श्री समशेरखान व गो ग्रीन सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम