वैजापूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ उत्साहात संपन्न; 238 लाभार्थ्यांना मिळाला शासकीय योजनांचा लाभ

बातमी शेअर करा...

वैजापूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ उत्साहात संपन्न; 238 लाभार्थ्यांना मिळाला शासकीय योजनांचा लाभ

चोपडा : चोपडा विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या उपस्थितीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत चोपडा तालुक्यातील वैजापूर आदिवासी मंडळ व परिसरात विशेष शिबिराचे आयोजन सोमवार, दिनांक 26 मे रोजी करण्यात आले. या अभियानामध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या शिबिरात एकूण 238 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला. उपस्थित खातेदार व ग्रामस्थांनी विविध अडचणी, शासकीय कामकाजातील अडथळे आणि गरजा मांडल्या. या तक्रारींची तत्काळ दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांविषयी नाराजी व्यक्त करत प्रांत अधिकाऱ्यांना नोटीस काढून ताकीद देण्याचे निर्देश दिले. त्यांनी नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की, शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि त्यात कोणतीही अडथळे येऊ देणार नाही.

या समाधान शिबिरास नितीन मुंडावरे (उपविभागीय अधिकारी), अरुण पवार (प्रकल्प अधिकारी), अण्णासाहेब घोलप (उपविभागीय पोलीस अधिकारी), भाऊसाहेब थोरात (तहसीलदार), अनिल विसावे (गटविकास अधिकारी), डॉ. प्रदीप लासुरकर (तालुका आरोग्य अधिकारी), दीपक साळुंखे (तालुका कृषी अधिकारी), वीरेंद्र राजपूत (उपविभागीय अभियंता), विलेश ठाकरे (आरएफओ), बी.के. थोरात (एएफओ) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तसेच या अभियानात शिवसेना पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला.
प्रमुख उपस्थितांमध्ये ताराचंद राठोड, विकास पाटील, प्रताप पावरा, कैलास बाविस्कर, पिंटू पावरा, संतोष महाजन, प्रल्हाद तडवी, दत्ता पावरा, सौ. विद्याताई बारेला, नकुड पावरा, नाना महाराज, बबलू बारेला, प्रेमा बारेला, अरविंद बारेला, अन्नू ठाकूर, संजय कोळी, नंदलाल बारेला, नामदेव पवार यांचा समावेश होता.

हा उपक्रम नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरला असून, परिसरातील नागरिकांनी याचे कौतुक केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम