वैशाली वराडे यांची अधिसभेवर नामनिर्देशित नियुक्ती

बातमी शेअर करा...

वैशाली वराडे यांची अधिसभेवर नामनिर्देशित नियुक्ती

जळगाव, दि. ८ (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर शिक्षकेत्तर कर्मचारी प्रतिनिधी म्हणून वैशाली वराडे यांची नामनिर्देशित नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी केली असून, विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायदा, २०१६ मधील कलम २८(२)(व्ही) नुसार विद्यापीठाच्या अधिसभेवर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधून एका सदस्याचे नामनिर्देशन करण्याची तरतूद आहे. त्यानुसार वैशाली वराडे यांची निवड करण्यात आली आहे. त्या सध्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या अभियांत्रिकी कक्षात वरिष्ठ सहायक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या या निवडीबद्दल कुलगुरू प्रा. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम