व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

जळगाव शहरातील घटना

बातमी शेअर करा...

व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

जळगाव शहरातील घटना

जळगाव I प्रतिनिधी
एका ३२ वर्षीय तरुणाचा येथील पिप्राळा भागातील मयूर कॉलनीत असलेल्या सदभाव व्यसनमुक्ती केंद्रात शुक्रवारी दि. १७जानेवारी रोजी दुपारी वाजेच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला आहे. चेतन विकास अत्तरदे (वय ३२, रा. विठोबा नगर, खेडी रोड, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

चेतन हा मुंबई येथे असलेली नोकरी सोडून जळगावात आला होता.चेतनला त्याचे आई वडील पिंप्राळ्यातील व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन आले होते. तेथून त्याचे कपडे आणण्यासाठी म्हणून ते घरीगेले असता त्यांना, चेतनला शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली. दरम्यान, चेतनला कोणतेतरी इंजेक्शन दिले व त्याचा साईडइफेक्ट होऊन त्याचा मृत्यू झाला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.तर दुसरीकडे, सदभाव व्यसनमुक्ती केंद्रात संचालक अशोक शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, चेतन व त्याचे २ ते ३ मित्र हे केंद्रात आले होते. त्यावेळीचर्चा झाल्यावर चेतन हा केंद्रात झोपून गेला, काही वेळाने त्याला उठविले असता तो उठला नाही. तेव्हा केंद्रातील भूषण पाटील व कर्मचाऱ्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले, अशी माहिती शुक्ला यांनी दिली आहे. तर शासकीय रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे. सदर मृत्यू हा संशयास्पद असल्याने शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रामानंद नगर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम