व्यापाऱ्याची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या
व्यापाऱ्याची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या
शिरसोली रेल्वे स्थानकाजवळची घटना
जळगाव प्रतिनिधी
व्यावसायाच्या कर्जबाजाराला कंटाळून कढोली येथील व्यापाऱ्याने धावत्या रेल्वे खाली येवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिरसोली रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश बंडू बडगुजर (वय ६१) रा. कढोली ता. जळगाव असे मयत झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील कढोली गावात गणेश बडगुजर हे पत्नी, दोन मुलं आणि सुना यांच्यासोबत कुटुंबासह वास्तव्याला होते. धान्याचा व्यापार करून आपला उदरनिर्वाह करत होते. व्यावसायासाठी त्यांन कर्ज काढलेले होते. या कर्जामुळे ते गेल्या काही
दिवसांपासून विचंचनेत होते. सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ते शिरसोली येथील रेल्वे खंबा क्रमांक ४१३च्या २३ जवळ डाऊन रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली येवून आपली जीवनयात्रा संपविली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मिनाबाई, दोन मुलं सचिन आणि आशिष तसेच दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी, अनिल फेगडे हे करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम