
व.वा वाचनालयात रंगला जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा “वाचन मेळावा”
व.वा वाचनालयात रंगला जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा “वाचन मेळावा”
अब्दुल कलाम ते मार्कस ऑरेलियस विविध पुस्तकांचा समावेश
जळगाव: शहरालगत असलेल्या सावखेडा शिवार येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलतर्फे जळगाव शहराच्या मध्यवर्ती असलेले वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय येथे “ पुस्तक आढावा” उपक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जागतिक ख्यातीच्या लेखकांच्या पुस्तकांवरील आपले अनुभव, विचार आणि प्रेरणा प्रभावी पद्धतीने मांडून उपस्थितांना प्रेरित केले.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पुस्तकांमध्ये ‘Meditations, – मार्कस ऑरेलियस, ‘Dream Psychology’ – सिग्मंड फ्रॉईड, ‘The Professor’ – शार्लोट ब्राँटे, ‘Wings of Fire’ व ‘Ignited Minds’ – ए. पी. जे. अब्दुल कलाम, ‘Atomic Habits’ – जेम्स क्लिअर, ‘Build Your Confidence’ – तारा वॉर्ड, तसेच ‘Three Mistakes of My Life’ – चेतन भगत या विविध लेखकांच्या पुस्तकांचा समावेश होता.
यावेळी शाळेचे विद्यार्थी धैर्य दोशी, उत्कर्ष पाटील, सोहम पाटील, विधी सोनी, शिनी जोशी, समीक्षा जैन, मिहिरसिंह मौर्य, कृतांश सुराणा आणि नैतिक कोठारी यांनी सहभाग घेतला. सहभागी सर्व विध्यार्थ्यानी आपल्या पुस्तकातील महत्त्वपूर्ण विचार प्रेक्षकांसमोर सादर करून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती विकसित करण्यासह विचारांची सखोलता, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा समन्वय साधला गेला. हा उपक्रम विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारा आणि वाचनाची आवड वाढवणारा ठरल्याचे जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका क्रिस्टाबेल परेरा यांनी सांगितले. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती पलकजी रायसोनी यांनी अभिनंदन केले. यावेळी शहराच्या मध्यवर्ती भागातील वाचनालय ज्ञान, संस्कृती आणि उत्साहाने भरलेले एक वाचनसंस्कृतीचे केंद्र बनले होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम