
शंकरराव नगरातून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त
शंकरराव नगरातून गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त
एकास अटक : शनिपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव : शंकरराव नगर परिसरातील स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकूर (२२) याच्याकडून शनिपेठ पोलिसांनी गावठी कट्टा व पाच जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी रात्री शंकरराव नगर परिसरात करण्यात आली. या प्रकरणी स्वप्नील ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.
शंकरराव नगर परिसरात स्वप्नील ठाकूर हा गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी पोउनि योगेश ढिकले, पोहेकॉ शशिकांत पाटील, प्रदीप नन्नवरे,
पोकॉ रवींद्र साबळे, नीलेश घुगे, नवजीत चौधरी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथक शंकरराव नगर परिसरातील १०० फुटी रस्त्यालगत गेले असता तेथे बसलेला स्वप्नील ठाकूर हा पोलिसांना पाहून तेथून पायी जाऊ लागला. संशय आल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २० हजार रुपये किमतीची गावठी पिस्तूल, पाच हजार रुपये किमतीचे पाच जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी ते जप्त केले. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम