शंभर दिवसांच्या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील अतिक्रमित पाणंद रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

बातमी शेअर करा...

शंभर दिवसांच्या मोहिमेत जळगाव जिल्ह्यातील अतिक्रमित पाणंद रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

जळगाव, – जळगाव जिल्ह्यात अतिक्रमित आणि बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद, शिवाररस्ते, तसेच शेतीसाठी आवश्यक मार्ग मोकळे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी मोहीम राबविली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतलेल्या या शंभर दिवसांच्या मोहिमेचा पहिला टप्पा 22 मार्च 2025 रोजी यशस्वीपणे पूर्ण झाला.

महसूल विभाग, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील 155 गावांमधील 152 रस्त्यांची अडथळे दूर करण्यात आली, ज्यामुळे 223.4 किलोमीटर लांबीचे रस्ते शेतकऱ्यांसाठी मोकळे झाले. या उपक्रमाचा थेट 6,283 शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.

तालुकानिहाय मोहिमेचा आढावा

अमळनेर: 10 रस्ते, 15.9 किमी, 2280 लाभार्थी

भडगाव: 4 रस्ते, 5.5 किमी, 65 लाभार्थी

भुसावळ: 4 रस्ते, 8 किमी, 272 लाभार्थी

बोदवड: 3 रस्ते, 4 किमी, 20 लाभार्थी

चाळीसगाव: 23 रस्ते, 29 किमी, 112 लाभार्थी

चोपडा: 21 रस्ते, 36.5 किमी, 639 लाभार्थी

धरणगाव: 13 रस्ते, 18.6 किमी, 384 लाभार्थी

एरंडोल: 7 रस्ते, 9.7 किमी, 382 लाभार्थी

जळगाव: 12 रस्ते, 19 किमी, 150 लाभार्थी

जामनेर: 8 रस्ते, 11 किमी, 530 लाभार्थी

मुक्ताईनगर: 6 रस्ते, 12 किमी, 332 लाभार्थी

पाचोरा: 2 रस्ते, 2.5 किमी, 140 लाभार्थी

पारोळा: 10 रस्ते, 4.4 किमी, 108 लाभार्थी

रावेर: 19 रस्ते, 32.3 किमी, 622 लाभार्थी

यावल: 10 रस्ते, 15 किमी, 247 लाभार्थी

शेतीसाठी लाभदायक उपक्रम

या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी अडथळामुक्त मार्ग उपलब्ध झाला आहे. यामुळे शेतीमालाची वाहतूक सोपी होऊन वेळ आणि खर्च वाचणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमाला सहकार्य करावे आणि आपल्या हक्काच्या रस्त्यांसाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

शासनाचा निर्धार – शेतीसाठी सुगम रस्ते

जळगाव जिल्ह्यात अतिक्रमणमुक्त रस्त्यांची ही मोहीम पुढील टप्प्यात अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा प्रशासनाचा मानस आहे. शासनाच्या धोरणांतर्गत अशा सुधारणा सातत्याने केल्या जातील, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा आणि सोयीचा रस्ता मिळू शकेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम