शंभुराजे राज्याभिषेक दिनी मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा समिती तर्फे आयोजन
शंभुराजे राज्याभिषेक दिनी मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा समिती तर्फे आयोजन
धुळे I प्रतिनिधी
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी घडविलेले स्वराज्याचे दुसरे छत्रपती महाज्ञानी, महापराक्रमी, छत्रपती संभाजीराजे यांचा आज दिनांक १६ जानेवारी रोजी राज्याभिषेकदिन त्यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा समिती तर्फे शंभुतिर्थ धुळे येथील स्वराज्यरक्षक छ.संभाजी महाराज यांचे पुतळ्याचा पंचामृत अभिषेक डॉ योगेश ठाकरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.
प्रसंगी मराठा सेवा संघाने मा पुरूषोत्तम खेडेकर साहेबांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सन २०२५चे काढलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन छावा प्रदेशाध्यक्ष मा किशोरजी चव्हाण, डॉ योगेशजी ठाकरे, साहेबरावजी देसाई यांच्या हस्ते करण्यात आले, सदर कॅलेंडर संपूर्ण देशातील समाजबांधवांच्या प्रथम पसंतीचे आहे कारण त्यात इतिहासातील अतिशय उपयुक्त अशा नोंदी अधोरेखित केलेल्या असतात,
तसेच अनेक महत्त्वाचे विषययांवर लेख देखील असतात व संपूर्ण देशातील, परदेशातील मराठा सेवा संघाच्या महत्त्वाचे पदाधिकारी यांचे संपर्क क्रमांक देखील दिलेले असतात. त्यामुळे संपूर्ण देशात कॅलेंडरला प्रचंड मागणी असते सदर प्रकाशन सोहळ्याला डॉ योगेश ठाकरे, साहेबराव देसाई, किशोर चव्हाण,बी ए पाटील, राजेंद्रभाऊ इंगळे,राजुभाऊ जाधव ,मनोजभाऊ ढवळे, समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम, अर्जुन पाटील,कोमल आभाळे,आबा कदम, दिनेश काळे, जिजाऊ ब्रिगेड च्या डॉ सुलभा ताई कुंवर,अलकाताई बोरसे, शाम निरगुडे, सुनील ठाणगे, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक,अमर फरताडे,समीतीचे ॲड नितीन पाटील, अभिनव पाटील, मनोज पवार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम