शक्ती एनर्जी सोल्युशन्सकडून पुण्यात एआय-आधारित इन्व्हर्टर आणि भारत-रेडी सोलर रूफटॉपचे भव्य लाँचिंग

बातमी शेअर करा...

शक्ती एनर्जी सोल्युशन्सकडून पुण्यात एआय-आधारित इन्व्हर्टर आणि भारत-रेडी सोलर रूफटॉपचे भव्य लाँचिंग

पुणे प्रतिनिधी – आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक भक्कम पाऊल टाकत शक्ती एनर्जी सोल्युशन्सने पुण्यातील शेरेटनच्या फोर पॉइंट्स हॉटेलमध्ये भव्य लाँचिंग सोहळा आयोजित केला. या कार्यक्रमात चॅनल पार्टनर्स, डीलर्स आणि स्टेकहोल्डर्सनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि भारताला स्वच्छ व शाश्वत ऊर्जेकडे नेण्याच्या ध्येयाचा पुनरुच्चार केला.

या सोहळ्यात कंपनीने ‘मेड इन भारत, मेड फॉर भारत’ या तत्त्वज्ञानावर आधारित नेक्स्ट जनरेशन सोलर रूफटॉप सिस्टिम आणि अत्याधुनिक सनशक्ती एआय-आधारित इन्व्हर्टर सादर केला. हा इन्व्हर्टर न्यूरल नेटवर्क तंत्रज्ञानावर आधारित असून व्होल्टेज बदल आणि पॉवर फ्लक्चुएशननुसार स्वतःला जुळवून घेतो. त्यात रिमोट कनेक्टिव्हिटी, प्रगत डिजिटल कंट्रोल आणि सोप्या इंस्टॉलेशनची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे तो भारतीय घरांसाठी अधिक उपयुक्त आणि अखंडित वीज पुरवणारा ठरतो.

शक्ती एनर्जी सोल्युशन्सचे सीईओ श्री. रामकृष्ण सतलुरी यांनी सांगितले की, “ही प्रणाली भारतीय हवामान लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. टिकाऊपणा, उत्कृष्ट ऊर्जा उत्पादन आणि स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टिम यामुळे ग्राहकांना रिअल-टाइममध्ये ऊर्जा उत्पादन तपासता येणार असून कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढणार आहे.”

या कार्यक्रमात भागीदारांनी उत्तर प्रदेशासह विविध राज्यांत सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या अखेरीस श्री. सतलुरी म्हणाले, “आमचे ध्येय केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे नाही, तर स्वच्छ, विश्वासार्ह आणि स्मार्ट ऊर्जा सोल्युशन्सद्वारे समाज सक्षम करणे आहे. आमच्या भागीदारांच्या सहकार्याने आम्ही भारतात स्वच्छ ऊर्जा क्रांतीचे नेतृत्व करू.”

शक्ती एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (SESL) ही शक्ती पंप्स (इंडिया) लिमिटेडची उपकंपनी असून, सौर ऊर्जा क्षेत्रातील एकात्मिक सोल्युशन्स देण्यात अग्रगण्य आहे. सोलर मॉड्यूल्स, इन्व्हर्टर्स आणि मॉड्यूल माउंटिंग स्ट्रक्चर्स एकाच छताखाली उपलब्ध करून SESL ग्राहकांना गुणवत्ता, जलद वितरण, दीर्घकाळ टिकणारी कामगिरी आणि किफायतशीर उपाय देण्यास कटिबद्ध आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम