
शनिपेठ येथे श्रीरामदेवजी बाबा दशमी व सव्वा महिन्याचा उपवासाची सांगता
शनिपेठ येथे श्रीरामदेवजी बाबा दशमी व सव्वा महिन्याचा उपवासाची सांगता
जळगाव प्रतिनिधी I मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्रीरामदेवजी बाबा दशमी व सव्वा महिन्याचा उपवासाची सांगता आज २ रोजी करण्यात आली. त्या निमित्ताने महाप्रसाद (भंडारा ) चे आयोजन करण्यात आले होते.
भंडारा सुरु होण्याआधी श्री रामदेवबाबाची आरतीशिवचरण ढंडोरे व .पोलिस निरीक्षक शनिपेठ कावेरी कमलाकर,पोलिस कर्मचारी योगेश साळवे यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता गुरुनानक नगरातील ममूराबाद रस्त्यावरील हनुमान मंदिरात करण्यात आली. या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रेम पवार, कन्हैया जाधव, नंदलाल गोडाले,राजेश चावरिया,राम भैया पवार, पवन जाधव, कुणाल पवार, राहुल पवार, वीनू पवार, अॅड. विशाल रील,शुभम पवार, अजय अटवाल,सोनू चिरावंडे आदी समाज बांधव उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम