
शरद पवार यांच्या वाढदिवसानिम्मित गरजूंना ब्लॅंकेट व अल्पोपहार वाटप
शरद पवार यांच्या वाढदिवसानिम्मित गरजूंना ब्लॅंकेट व अल्पोपहार वाटप
राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा रुग्णालयात उपक्रम
जळगाव प्रतिनिधी शरदचंद्र पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसा निम्मित जळगाव महानगर राष्ट्रवादीच्या वत्तीने आज सिव्हिल हॉस्पीटल (सरकारी दवाखाना) येथे गोरगरीब तसेच अंध अपंग लोकांना ब्लॅंकेट व अल्पोउपाहार वाटप करण्यात आले व जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला
देशाचे लोक नेते पद्मभूषण माजी केंद्रीय कृषी मंत्री व संरक्षण मंत्री शरदचंद्र पवार यांनी देशातील शेतकऱ्यानं साठी एक रकमी कर्ज माफी केलीय , महिला साठी ५० टक्के आरक्षण तसेच युवकानं साठी बेरोजगारी कमी करण्या साठी युवकांना IT सेक्टर उभारले , त्यांनी ८० टक्के समाज कारण व २० टक्के राजकारण केले व गोरगरीब नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे
या कार्यक्रमा प्रसंगी प्रदेश सरचिटणी रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलिक , जिल्हा समन्वयक विकास पवार , जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी , महिला महानगर अध्यक्ष मंगलाताई पाटील ,माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवांजरी , युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील , सामाजिक न्याय प्रमुख रमेश बहारे , विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष गौरव वाणी , माजी नगरसेवक राजू मोरे , अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मजहर पठाण , माजी नगरसेवक डॉ. रिजवान खाटिक , भुसावळ तालुका अध्यक्ष दिपक मराठे , महानगर सरचिटणीस रहीमभाई तडवी , जेष्ठ आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील , महानगर उपंअघ्यक्ष आशीफ शेख , युवक सरचिटणीस मतिन सैय्यात , फरान शेख , पप्पू जकातदार इतर पदाधिकारी उपस्थित होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम